(Photo - Anil Shinde)
मुंबई

Mumbai : दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी; सांताक्रूझमध्ये १०.२ मिमी पावसाची नोंद

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर दिसून येत आहे.

Swapnil S

मुंबई : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी हलक्या पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेत १०.२ मिमी पावसाची नोंद झाली, असे हवामान

विभागाने स्पष्ट केले. मात्र, कुलाबा वेधशाळेत पावसाची नोंद झाली नाही. सांताक्रूझ वेधशाळेत १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान एकूण १४.६ मिमी पाऊस नोंदवला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर २८ ऑक्टोबरच्या पहाटे धडकलेल्या 'अर्नब' या अतितीव्र चक्रीवादळाच्या उर्वरित आर्द्रतेमुळे मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. चक्रीवादळाचे मुख्य वाऱ्यांचे क्षेत्र पुढे सरकले असले, तरी त्यातून निर्माण झालेली आर्द्रता आणि बदललेल्या वाऱ्यांच्या दिशेमुळे मुंबईसह परिसरात हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी रविवारपासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शनिवारी कमाल तापमान कुलाबा येथे ३४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३२.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. किमान तापमान अनुक्रमे २७.२ आणि २५.२ अंश सेल्सिअस होते.

पाऊस पडूनही मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही. कुलाबा येथे आर्द्रतेचे प्रमाण ८२ टक्के, तर सांताक्रूझ येथे ९२ टक्के नोंदवले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विदेशापेक्षा देशी विमान प्रवास महागला; मुंबई-दिल्ली विमान भाडे २६,५६०, मुंबई-लंडन २५,५०० रुपये

'इंडिया' आघाडीची आज महारॅली

Mumbai : सीएनजी एक रुपयाने पुन्हा महागला; ९० रुपये किलोवर दर पोहोचला

'इस्रो'ने लाँच केले जीएसएलव्ही-एफ१८; उपग्रह 'एनव्हीएस-०३' अवकाशात स्थापित

इंडिया आघाडीचा 'जन-महाभियोग'; खर्गे यांचे ६ आरोप, ३ मागण्या