Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल X|MumbaiPolice
मुंबई

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

दहिसरमध्ये गटारात पडलेल्या एका व्यक्तीची पोलिसांनी थरारक सुटका केली. दुसरीकडे, चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ मोठे झाड उन्मळून पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mayuri Gawade

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि अपघातांच्या घटना घडत आहेत. अशातच दहिसरमध्ये गटारात पडलेल्या एका व्यक्तीची पोलिसांनी थरारक सुटका केली. दुसरीकडे, चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ मोठे झाड उन्मळून पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

मुंबई पोलिसांनी गुरुवारी (दि. २) सोशल मीडियावर या थरारक बचावकार्याचा व्हिडीओ शेअर करत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर परिसरातील एका गटारात एक व्यक्ती चुकून पडून वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ अडकली होती. याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळताच दहिसर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू केले.

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मिळून संबंधित व्यक्तीला बाहेर काढताना दिसत आहेत. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी गटारावरील लोखंडी जाळी कापण्यात आली. त्यानंतर त्याला सुरक्षित बाहेर काढून तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याची कुटुंबीयांशी भेट घालून दिली.

चर्चगेटजवळ झाड कोसळून वाहनांचे नुकसान

दरम्यान, गुरुवारी पहाटे मुसळधार पावसामुळे चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ एक मोठे झाड उन्मळून पडले. हे झाड रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर कोसळल्याने काही चारचाकी वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक दुचाकी झाडाखाली अडकल्या.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये झाडाखाली दबलेली वाहने आणि घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती