लाखांचा अपहार संग्रहित छायाचित्र
मुंबई

बलात्कार हे भयंकर कृत्य; पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त होते, कोर्टाचे याचिकेदरम्यान निरीक्षण, पोक्सोच्या गुन्ह्यातील नराधमाला तुरुंगवास

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे.

Swapnil S

मुंबई : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे. बलात्कार एक भयंकर कृत्य आहे. या कृत्याला सामोरे गेलेल्या पीडित मुलीचे आयुष्य बलात्कारामुळे उध्वस्त होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि पोक्सोच्या गुन्ह्यातील साठ वर्षांच्या वृद्ध नराधमाला दोषी ठरवत त्याला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. जे. पी. दरेकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

धारावी येथील संग्रामनगर झोपडपट्टीमध्ये राहणारा साठ वर्षांचा मजूर नरसाप्पा कोरमोल्लू याच्याविरुद्ध धारावी पोलिसांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो मागील पाच वर्षे ६ महिने तुरुंगात आहे. अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

आरोप सिद्ध करण्यासाठी धारावी पोलीस आणि विशेष सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी सबळ पुरावे सादर केले. त्याची गंभीर दखल घेत विशेष न्यायाधीश दरेकर यांनी वृद्ध नराधमाला पोक्सो कायदा व भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत दोषी ठरवले. याचवेळी त्याला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या प्रकरणातील पीडित मुलीचा वृद्ध नराधमावर खोटा आरोप करण्याचा कोणताही हेतू दिसून येत नाही. अशा परिस्थितीत पीडित मुलीला सामोरे जावे लागलेल्या गुन्ह्याकडे अत्यंत कठोरपणे पाहण्याची गरज आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

हा निर्णय देत असतानाच विशेष न्यायाधीशांनी अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या कृत्याबाबत महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

न्यायालयाची निरीक्षणे

बलात्कार एक भयंकर कृत्य असून या कृत्यामुळे पीडितेचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होऊन जाते. पीडितेवर शारीरिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक आघात होतो.

बलात्काराची पीडित ही दुसर्‍या व्यक्तीच्या वासनेची बळी असते, हे सर्वमान्य आहे. त्यामुळेच अशा प्रकरणात पीडितेच्या पुराव्याला इतर कोणत्याही साक्षीदारांपेक्षा सर्वोच्च स्थान असते.

बलात्काराच्या घटनेचा पीडितेच्या मनावर आणि आत्म्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत पीडीतेला कोणतीही भरपाई पुरेशी असू शकत नाही. घटनेमुळे पीडितेच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करता येणार नाही.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री