Mumbai : सहारा स्टार हॉटेलवर जप्तीची टांगती तलवार; मालमत्ता कर थकवल्याने BMC ॲक्शन मोडवर  
मुंबई

Mumbai : सहारा स्टार हॉटेलवर जप्तीची टांगती तलवार; मालमत्ता कर थकवल्याने BMC ॲक्शन मोडवर

मालमत्ता कर भरण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या सहारा स्टार हॉटेलवर आता जप्तीची टांगती तलवार आहे.

Swapnil S

मुंबई : मालमत्ता कर भरण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या सहारा स्टार हॉटेलवर आता जप्तीची टांगती तलवार आहे. तब्बल ४१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी अंधेरी येथील सहारा स्टार हॉटेलविरोधात मुंबई महापालिका लवकरच जप्तीची कारवाई करणार आहे. उच्च न्यायालयाने एका महिन्याच्या आत २३ कोटी रुपयांचा कर भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र दोन महिने उलटले तरी हॉटेल व्यवस्थापनाने एक रुपयाही न भरल्याने पालिका ॲक्शन मोडवर आली आहे.

थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने यापूर्वी हॉटेलचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्याविरोधात हॉटेल व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कर भरण्याचे निर्देश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही. विशेष म्हणजे, त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने न्यायालयातील याचिकाही मागे घेतली आहे.

उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्यानंतर आमच्यासमोर कारवाईचा मार्ग खुला झाला आहे. अंतिम नोटीस दिल्यानंतरही मालमत्ता कर भरला गेला नाही, तर मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करण्यात येईल.
विश्वास शंकरवार, उपायुक्त, करनिर्धारण व संकलन विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा