मुंबई मंडळातील १६ हजार २५९ विद्यार्थी नापास 
मुंबई

मुंबई मंडळातील १६ हजार २५९ विद्यार्थी नापास; मुंबईचा निकाल ९४.९७ टक्के; पश्चिम उपनगरातील मुले हुशार

राज्य मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.८७ टक्क्यांची घट झाली आहे तर यंदाच्या परीक्षेत सुमारे १६ हजार २५९ विद्यार्थी नापास झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्य मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.८७ टक्क्यांची घट झाली आहे तर यंदाच्या परीक्षेत सुमारे १६ हजार २५९ विद्यार्थी नापास झाले आहेत. या निकालात मुंबई विभागातील पश्चिम उपनगराने बाजी मारली असून या भागाचा निकाल ९६.६५ टक्के लागला आहे.

दहावी परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३ लाख २५ हजार ९१८ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख २३ हजार ७३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ३ लाख ७ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.९७ टक्के आहे. या परीक्षेला १ लाख ६६ हजार ६०३ मुले बसली होती. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९३.६३ टक्के आहे तर १ लाख ५७ हजार १३६ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ५१ हजार ४८५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.४० टक्के आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.८७ टक्क्यांनी घट

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल ९५.८४ टक्के लागला होता. यंदा मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के लागला आहे. या निकालात गतवर्षीच्या तुलनेत ०.८७ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यातून १ लाख १० हजार ९०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.०४ टक्के लागला आहे, तर रायगड जिल्ह्यातून ३५ हजार २१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ टक्के आहे. पालघर जिल्ह्यातून ६० हजार ५५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५६ हजर २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल ९२.९२ टक्के लागला आहे.

मुंबई, उपनगरात अशी कामगिरी

मुंबई शहरातून २५ हजार ३८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४ हजार ४५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९६.३७ टक्के लागला आहे. तर पश्चिम उपनगरातून ५० हजार ३५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ४८ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९६.६५ टक्के लागला आहे. पूर्व उपनगरातून ४१ हजार ३३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३९ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.८६ टक्के आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी