चार वर्षांत मुंबईत ३ नवीन कॅन्सर रुग्णालये; सुविधांचे सक्षमीकरण, सायन, नायर आणि जे.जे.त मिळणार अत्याधुनिक उपचार 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

चार वर्षांत मुंबईत ३ नवीन कॅन्सर रुग्णालये; सुविधांचे सक्षमीकरण, सायन, नायर आणि जे.जे.त मिळणार अत्याधुनिक उपचार

देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता मुंबईतील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव/मुंबई

देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता मुंबईतील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने येत्या चार वर्षांत शहरात तीन अत्याधुनिक सरकारी कॅन्सर रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत.

याशिवाय, २०३० पर्यंत पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये रोबोटिक सर्जरीची सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, राज्य सरकार जेजे रुग्णालयातही ही यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. नवीन रुग्णालयांच्या उभारणीमुळे टाटा मेमोरियल रुग्णालयावरील रुग्णांचा प्रचंड ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय म्हणजेच सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात १३ मजली स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारले जात आहे. २०० खाटांच्या या रुग्णालयात रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि पेट-सिटी स्कॅन यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध असतील.

बीवायएल नायर रुग्णालयातील कॅन्सर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात असून २०२७ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. येथे दररोज सुमारे २५० रुग्णांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, राज्य सरकार जेजे रुग्णालयाजवळ २०० खाटांचे रुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारण्याच्या तयारीत असून त्यासाठी रिचर्डसन अँड क्रुडासची ११ एकर जागा मिळवण्यासाठी महसूल विभागाशी चर्चा सुरू आहे.

रोबोटिक सर्जरी सुरू करण्याचे नियोजन

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी महापालिकेने २०३० पर्यंत आपल्या प्रमुख रुग्णालयांमध्ये रोबोटिक सर्जरी सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सध्या केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभागात ही सुविधा उपलब्ध असून, आगामी काळात सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातही तिचा विस्तार केला जाणार आहे. सरकारी योजनेंतर्गत या रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतील, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांना तातडीने आणि स्वस्त दरात उपचार मिळणे सुलभ होईल.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...