मुंबईकरांनो, 'स्वाईन फ्लू' बळावतोय; रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ, तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईकरांनो, 'स्वाईन फ्लू' बळावतोय; रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ, तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद

देशातील विविध महानगरांप्रमाणेच मुंबईतही ‘इन्फ्लुएन्झा ए’ (एच१एन१) अर्थात ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत ३०९ ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Swapnil S

मुंबई : देशातील विविध महानगरांप्रमाणेच मुंबईतही ‘इन्फ्लुएन्झा ए’ (एच१एन१) अर्थात ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत ३०९ ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, परिस्थिती चिंताजनक नसून घाबरण्याची गरज नाही, असेही ‘आयएमए’ने स्पष्ट केले आहे.

‘आयएमए’ने बुधवारी जारी केलेल्या आरोग्य सल्ल्यात म्हटले आहे की, ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’च्या (आयसीएमआर) देखरेखीत सध्या आढळणारा विषाणू हा हंगामी ‘इन्फ्लुएन्झा ए’च (एच१एन१) असून त्यामध्ये कोणतेही नवीन जनुकीय बदल आढळलेले नाहीत.

बहुतांश प्रकरणे सौम्य स्वरूपाची

‘आयएमए’नुसार, स्वाईन फ्लूची बहुतांश प्रकरणे सौम्य स्वरूपाची असून ती स्वतःहून बरी होतात. या आजारामध्ये अचानक तीव्र ताप येणे, थंडी वाजणे, सतत कोरडा खोकला, घशात खवखव, स्नायू दुखणे, थकवा, डोकेदुखी तसेच नाक वाहणे किंवा बंद होणे अशी लक्षणे दिसून येतात. मुलांमध्ये याशिवाय मळमळ, उलट्या किंवा जुलाबाची लक्षणेही आढळू शकतात.

‘आयएमए’ने प्रतिजैविकांच्या अनावश्यक वापराबाबतही इशारा दिला आहे. ‘स्वाईन फ्लू’ हा विषाणूजन्य आजार असल्याने अँटिबायोटिक्स त्यावर प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे ॲझिथ्रोमायसिन, अमॉक्सिसिलिन-क्लॅव्ह्युलानेट किंवा सेफिक्सिम यांसारखी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

गंभीर लक्षणे आढळल्यास घ्या वैद्यकीय मदत

श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, ओठ किंवा बोटे निळी पडणे, रक्तमिश्रित कफ येणे, गोंधळाची अवस्था, झटके येणे, सतत उलट्या होणे किंवा द्रवपदार्थ घेता न येणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलांमध्ये दूध किंवा अन्न घेण्यास नकार, अतिशय सुस्ती, गुरगुरण्यासारखा श्वास किंवा छाती आत ओढली जाणे ही धोक्याची लक्षणे मानली जातात.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

शासन व्यवहारासाठी राज्य सहकारी बँकेची निवड

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचा; एकनाथ शिंदेंची घोषणा, भाजपमध्ये चलबिचल 

'मराठी'साठी एक वर्षाची मुदतवाढ; फडणवीसांची घोषणा; रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी?