Mumbai : चेहरा पडताळणी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी; पहिल्याच दिवशी गोंधळ; पत्रकार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूट 
मुंबई

Mumbai : चेहरा पडताळणी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी; पहिल्याच दिवशी गोंधळ; पत्रकार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूट

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान विधान भवनातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी विधान भवन प्रशासनाने चेहरा पडताळणीचा नियम लागू केला आहे.

Swapnil S

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान विधान भवनातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी विधान भवन प्रशासनाने चेहरा पडताळणीचा नियम लागू केला आहे. मात्र, सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या प्रवेश नियमांतील तांत्रिक त्रुटींमुळे गोंधळाची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे पहिल्या दिवशी या नियमावलीला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृहात करावी लागली.

विधान भवनात प्रवेशासाठी फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे प्रवेश दिला जाईल, असा निर्णय विधिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी ई-मेलद्वारे संबंधितांची माहिती मागवण्यात आली होती. अनेकांनी सूचनेप्रमाणे रकान्यात माहिती भरून पाठवूनही त्याचा उपयोग झाला नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शनिवारी आणि रविवारी या प्रणालीसाठी नोंदणी केली. परंतु, अनेकांची नोंदणीच न झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर गर्दी टाळण्यासाठी पत्रकार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्राने प्रवेश देण्यात आला.

Dahi Handi 2026 : उत्सवाला गालबोट! दोन ठार; २०० गोविंदा जखमी; अनेकांच्या डोक्याला-मणक्याला मार

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी

पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य