मुंबईतील प्रवेशद्वारावर पार्किंग हब; पालिका १५०० कोटी रुपये खर्च करणार  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईतील प्रवेशद्वारावर पार्किंग हब; पालिका १५०० कोटी रुपये खर्च करणार

२०१७ पासून ओस पडलेल्या दहिसर व मानखुर्द जकातनाक्यांवर लवकरच थ्री स्टार हॉटेल, शॉपिंग सेंटर, दुचाकी चारचाकी व बस व ट्रक यासाठी पार्किंग हब साकारण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : २०१७ पासून ओस पडलेल्या दहिसर व मानखुर्द जकातनाक्यांवर लवकरच थ्री स्टार हॉटेल, शॉपिंग सेंटर, दुचाकी चारचाकी व बस व ट्रक यासाठी पार्किंग हब साकारण्यात येणार आहे. दहिसर जकातनाक्यावर या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून लवकरच मानखुर्द जकातनाक्यावर सोयीसुविधासह पार्किंग हब साकारण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. यासाठी १५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशभरातील ट्रॅव्हल्सच्या बसेस येत असतात. यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे २०१७ पासून ओस पडलेल्या जकातनाक्यांवर सोयीसुविधासह पार्किंग हब साकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आता देशभरातून येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांना दहिसर व मानखुर्द चेकनाक्यांवरच खो मिळणार आहे. या पॅसेंजर गाड्या या ठिकाणी हॉल्ट घेऊन पुन्हा परतीला जातील. परंतु या ट्रॅव्हल्समधून येणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्ट बसेस, मेट्रो कनेक्टिव्हिटी, रिक्षा टॅक्सी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

पालिकेला महसूल, प्रवाशांना सुविधा

दहिसर जकातनाक्यावर सध्या १८,८६९ चौरस मीटर जागा आहे. तर मानखुर्द जकातनाक्यावर २९,७७४ चौरस मीटर जागा आहे. या दोन्ही ठिकाणी मोक्याच्या जागांचा सद्यस्थितीत पालिकेला कोणताही उपयोग होत नाही. मात्र आता सुविधा झाल्याने मुंबईत वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार असून पालिकेला महसूलही मिळणार आहे. या ठिकाणी गाड्यांना सीएनजी, पेट्रोल पंप, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग अशा आवश्यक इंधनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पीपीपी तत्त्वावर रुग्णालयात सुविधा

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात देशभरातील रुग्ण उपचारासाठी धाव घेत असतात. पीपीपी तत्त्वावर रुग्णालयाचा कारभार चालवण्यासाठी दिला तर रुग्णांकडून आकारण्यात येणारे दर पालिकेने ठरवून दिलेलेच असतील. पीपीपी तत्त्वावर रुग्णालयातील काही कामकाज दिले तरी अंकुश मुंबई महापालिकेचा असणार आहे. त्यामुळे रुग्णांसाठी चांगल्या प्रकारे पीपीपी धोरण कशाप्रकारे आणता येईल, याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन