Mumbai : प्रदूषण करणाऱ्यांना पकडण्यासाठी सेन्सरची मदत; २० दिवसात यंत्रणा बसवण्याचे कानपूर आयआयटीला निर्देश  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : प्रदूषण करणाऱ्यांना पकडण्यासाठी सेन्सरची मदत; २० दिवसात यंत्रणा बसवण्याचे कानपूर आयआयटीला निर्देश

मुंबईतील हवेचे वाढते प्रदूषण नेमके कोठून व कशामुळे होत आहे हे शोधून काढण्यासाठी शहरभरात ७५ ठिकाणी सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. पुढील वीस दिवसांमध्ये यासाठीची देखरेख यंत्रणा किंवा मॉनिटरींग नेटवर्क उभे करा असे निर्देश महापालिकेने कानपूर आयआयटीला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील हवेचे वाढते प्रदूषण नेमके कोठून व कशामुळे होत आहे हे शोधून काढण्यासाठी शहरभरात ७५ ठिकाणी सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. पुढील वीस दिवसांमध्ये यासाठीची देखरेख यंत्रणा किंवा मॉनिटरींग नेटवर्क उभे करा असे निर्देश महापालिकेने कानपूर आयआयटीला दिले आहेत.

'मुंबई एअर नेटवर्क फॉर ॲडव्हान्स सायन्सेस' (प्रोजेक्ट मानस) नावाच्या या प्रकल्पांतर्गत शाळा, कॉलेज आदी ७५ ठिकाणी सेन्सर आधारित ‘एअर क्वालिटी मॉनिटरिंग नेटवर्क’ स्थापन केले जाणार आहे. ९ ते १० महिन्यांपूर्वी अशी यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली आहे. आता जून अखेरपर्यंत यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्यामुळे प्रदूषण पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वाढत्या वाहनांमुळेही प्रदूषणाचा स्तर उंचावत असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईत ‘पीएम २.५’ व ‘पीएम १०’ प्रतीच्या धुळीचे प्रमाण वाढले आहे. साधारण वातावरणात पश्चिमी वाऱ्यांमुळे शहरातील धूळ मिश्रीत धुके समुद्राकडे वाहत जाते. परंतु वातावरण बदलामुळे (प्रामुख्याने हिवाळ्यात) वाहत्या वाऱ्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित धुके मुंबईत आच्छादून राहते आणि असे प्रदूषण आरोग्यास घातक ठरण्याची शक्यता असते.

सध्या मुंबईतील विविध भागांतील हवेच्या गुणवत्तेची माहिती देणारी २८ वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेख केंद्रे आहेत. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या प्रदूषण पातळीत भर घालणाऱ्या स्थानिक स्रोतांव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेशमधील मुंबईच्या लगतच्या इतर भागांतून प्रदूषक वाहून नेणारे पश्चिमेकडील वारेसुद्धा मुंबईतील प्रदूषण पातळीत वाढ करण्यास हातभार लावतात.

प्रदूषणाच्या हॉटस्पॉट्सवर नजर

  • मुंबईतील ७५ ठिकाणी सेन्सर आधारित एअर क्वालिटी मॉनिटरिंग नेटवर्कची स्थापना केली जाईल

  • मुंबई महापालिका आणि मुंबईतील इतर शासकीय संस्थासाठी एकात्मिक नियंत्रण आणि कमांड सेंटरचा भाग म्हणून प्रगत रिल टाइम एअर क्वालिटी ॲनालिटीक डॅशबोर्ड विकसित केला जाणार आहे.

  • सुधारित हवेच्या गुणवत्तेसाठी प्रभावी आणि जलद उपाययोजनांसाठी सेन्सर मॉनिटरींगद्वारे हॉटस्पॉट्स ओळखता येणार आहे.

  • मुंबईतील बांधकाम धूळ, रस्त्यावरील धूळ आणि प्रदूषणाच्या इतर मोठ्या स्रोतांद्वारे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

महागाई भडकणार! रिझर्व्ह बँकेचा इशारा; GDP वाढही घसरणार, तूर्तास रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय

'कॉकरोच'चे आज आंदोलन, अभिजीत दीपके येणार भारतात

Mumbai : 'बेस्ट' जमिनींची विक्री नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा

मान्सून गोव्यात इलो; राज्यभर मान्सूनपूर्व सरी

मनोरंजन संपले, आता खरी 'कसोटी'; मुल्लानपूर येथे आजपासून रंगणार भारताचा अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना