मुंबई विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर; १७२ कोटी ६३ लाखांची तूट; १०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर 
मुंबई

मुंबई विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर; १७२ कोटी ६३ लाखांची तूट; १०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा १०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये १७२ कोटी ६३ लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा १०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये १७२ कोटी ६३ लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य उपक्रमासह शैक्षणिक आणि गव्हर्नन्स उत्कृष्टता उपक्रमांसाठी ७५ कोटींची भरीव करण्यात आली आहे.

वित्तीय वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि सीएसआर अंतर्गत १८७ कोटी रुपयाचा निधी प्राप्त होणार आहे. यामध्ये केंद्र शासनाकडून १२९.५६ कोटी, राज्य शासनाकडून ३३ कोटी, सीएसआर अंतर्गत १३.९१ कोटी आणि मुंबई विद्यापीठाकडून रुपये १० कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे.

या अंतर्गत मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा), पीएम-उषा अंतर्गत ५० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची इमारत, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह, जीआर संबंधित नूतनीकरण, पीएम- उषा अंतर्गत एमयू-आयडीईएचएस इनक्युबेशन, मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील टिळक भवन या इमारतीचे नूतनीकरण, क्रीडा संकुल या इमारतीचे नूतनीकरण या इमारतीचे नूतनीकरण, महात्मा जोतिबा फुले परीक्षा केंद्र या इमारतीचे नूतनीकरण, लाइफ सायन्स या इमारतीचे नूतनीकरण, शंकरराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण केले जाणार आहे. तसेच जगन्नाथ शंकरशेठ हॉल, फोर्ट परिसर इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरण इमारतीचे नूतनीकरण, आरोग्य केंद्र या इमारतीचे नूतनीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतींसमोरील उंचीवरील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, ठाणे उपकॅम्पसमध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, १०० केडब्ल्यूपी सौरऊर्जा प्रणालीची पुरवठा, स्थापना, चाचणी व कार्यान्वयन तसेच ५ वर्षांचा एएमसी करार, कंपाऊंड वॉल बांधकामाचा प्रस्ताव ड्रेनेज (नाला) बांधकामाचा प्रस्ताव, क्रीडा सुविधांच्या बांधकामाचा प्रस्ताव, डॉ. आंबेडकर भवन येथे २० केडब्ल्यू सौरऊर्जा प्रणालीचा पुरवठा व स्थापना केली जाईल.

फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरच्या बाह्य व आंतरिक दिव्यांचे पुनर्स्थापन, तसेच ७० सौर रस्ते दिव्यांचा पुरवठा व स्थापना, दीक्षांत सभागृहाचे पुनर्स्थापन यासह विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामे सुरू केली जाणार आहेत.

नवी मुंबई APMC त कलिंगड विक्रेते हवालदिल; अफवांमुळे विक्रीत ३० टक्के घट

भय्यांना मराठी शिकवून काय साध्य होणार? राज ठाकरे यांचा सवाल राज्यकर्त्यांवर आणि माध्यमांवरही टीका

हार्बर लाइनवर आजपासून १४ एसी लोकल फेऱ्यांची भर

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुखला मोठा दिलासा

महिनाभरात चौदा 'बाबां'चा उठला बाजार; 'खरात' प्रकरणानंतर भोंदूंचा बुरखा फाटला; लैंगिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रकार उघड