Mumbai : विक्रोळीतून बोगदा खोदकामास सुरुवात; BKC च्या दिशेने भूमिगत बोगद्याचे खोदकाम करणार, भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टीबीएमचा वापर 
मुंबई

Mumbai : विक्रोळीतून बोगदा खोदकामास सुरुवात; BKC च्या दिशेने भूमिगत बोगद्याचे खोदकाम करणार, भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टीबीएमचा वापर

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीला गती आली आहे. भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टीबीएमद्वारे विक्रोळी येथून बोगदा खोदकामाला सुरुवात झाली आहे.

Swapnil S

मुंबई: मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीला गती आली आहे. भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टीबीएमद्वारे विक्रोळी येथून बोगदा खोदकामाला सुरुवात झाली आहे. हे टीबीएम विक्रोळी शाफ्टपासून बीकेसीच्या दिशेने भूमिगत बोगद्याचे खोदकाम करणार आहे.

या प्रकल्पातील एकूण २१ किमी भूमिगत बोगद्यापैकी सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) दरम्यानचा १६ किमीचा भाग टीबीएमच्या साहाय्याने निर्माण करण्यात येणार आहे, तर उर्वरित ५ किमीचा भाग न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीने (एनएटीएम) पद्धतीने यापूर्वीच पूर्ण करण्यात आला आहे. विक्रोळी येथे तब्बल ५६ मीटर खोल शाफ्ट उभारण्यात आला आहे.

रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली कार्यान्वित

बोगदा खोदकामादरम्यान परिसरातील इमारती आणि इतर संरचनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली बसविण्यात आली आहे.

असे आहे टीबीएम

हे टीबीएम १३.६ मीटर व्यासाच्या विशाल कटरहेडसह, सुमारे ३,१०० टन वजनाचे आणि ९६ मीटर लांबीचे आहे. या यंत्रामधील कटर व्हील प्रति मिनिट चार फेऱ्यांच्या वेगाने कार्य करते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२