नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवमतदारांची नोंदणी, प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांचे नाव दाखल करणे, मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच नाव वगळण्याबाबतची कार्यवाही या शिबिरांमध्ये केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई क्षेत्रात एसआयआर -२०२६ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत नाव नसल्यास किंवा मतदार यादीतील नोंदींबाबत आक्षेप असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.

प्रारूप मतदार यादीत गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे काही पात्र मतदारांची नावे समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. अशा नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या सोयीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

ऑनलाईन सुविधा

तसेच, मतदारांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा किंवा ECINET मोबाइल अॅपचा वापर करता येणार आहे. मुंबईतील पात्र नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंद तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Mumbai : अनधिकृत स्टॉलवर बडगा; कुर्ला स्टेशन परिसरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त; एल विभागाची धडक कारवाई