मुंबई

कोस्टल रोडच्या ‘सब वे’त पावसाळ्याआधीच पाणी

पावसाच्या आगमनाला दोन महिने शिल्लक असताना मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या ‘सब वे’त पावसाआधीच पाणी शिरल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : पावसाच्या आगमनाला दोन महिने शिल्लक असताना मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या ‘सब वे’त पावसाआधीच पाणी शिरल्याचे समोर आले आहे. ‘सब वे’त पाणी शिरल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान, या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांचे काम सुरू असून पावसाळ्याआधी काम पूर्ण होईल, असा दावा कोस्टल रोड प्रशासनाने केला आहे.

कोस्टल रोड प्रकल्पामध्ये नागरिकांना मुख्य भूभागापासून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सुमारे २० भुयारी मार्ग बांधले आहेत. हे ‘सब वे’ समुद्री सपाटीपासून सुमारे ४.९ मीटर उंच असल्याचा दावा कोस्टल रोड प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र भरतीच्या ठिकाणी यावेळी पाणी भरल्याचे प्रकार सुरू झाल्याने पालिकेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हाजीअली दर्ग्याकडे जाणाऱ्या सब वेमध्ये गुरुवारी भरतीचे पाणी शिरल्याचा प्रकार घडला. यावेळी दर्ग्याकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याने, नागरिकांनी पालिकेच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, सब वेमध्ये येणारे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी टाकी बांधण्यात येईल आणि ते समुद्रात सोडून हा प्रश्न सोडवला जाईल, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.

रस्त्याला भेगा

१३ हजार कोटींवर रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. या मार्गाचे वरळी ते मरीन ड्राइव्ह असा एक मार्गाचा टप्पा ११ मार्च रोजी वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या मार्गावर आताच भेगा पडल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, हे तडे किरकोळ असून ‘इपॉक्सी’ तंत्रज्ञानाने बुजवण्यात येणार असल्याचे कोस्टल रोड प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती