सात धरणांमध्ये फक्त २० टक्के पाणीसाठा; राखीव पाणीसाठा मुंबईला तारणार, राज्य सरकारची मंजुरी संग्रहित छायाचित्र
मुंबई

सात धरणांमध्ये फक्त २० टक्के पाणीसाठा; राखीव पाणीसाठा मुंबईला तारणार, राज्य सरकारची मंजुरी

मुंबईला पाणीपुरवठा धरणातील करणाऱ्या सातही पाणीसाठ्यात घट झाली आहे. सातही धरणात २ लाख ८९ हजार ५७२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे. त्यात आता राज्य सरकारने राखीव पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा धरणातील करणाऱ्या सातही पाणीसाठ्यात घट झाली आहे. सातही धरणात २ लाख ८९ हजार ५७२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे. त्यात आता राज्य सरकारने राखीव पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या धरणात उपलब्ध पाणी आणि राज्य सरकारकडून २ लाख २८ हजार दशलक्ष लिटर साठा उपलब्ध झाल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.

२० मे रोजी सातही धरणांत २०.१ टक्के म्हणजे २ लाख८९ हजार ५७२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. यासाठी राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती. मुंबई महापालिकेची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

राखीव कोट्याने तारले

तलावांत सद्यस्थितीत फक्त २,८२,५७२ दशलक्ष लिटर पाणी आहे. मुंबईला दररोज होणारा ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र राखीव कोट्यातील २२८३०० पाणी वापरण्याची परवानगी मिळाली असल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याची किमान दोन महिने राखीव कोट्यावर मदार राहणार आहे. अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० दशलक्ष लिटर तर भातसा धरणातून १ लाख ३७हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. राखीव पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

गेल्या तीन वर्षांची स्थिती

२०२६ - २,८९,५७२ दशलक्ष लिटर २०.०१ टक्के

२०२५ - २,५०,१९७ दशलक्ष लिटर १७.२९ टक्के

२०२४ - १,६४,९७० दशलक्ष लिटर ११.४० टक्के

२० मे रोजी उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

  • अप्पर वैतरणा - १८,३६०

  • मोडक सागर - ४३,६६०

  • तानसा - २२,००१

  • मध्य वैतरणा - ५०,५१७

  • भातसा - १,३९,११३

  • विहार - १३,४५०

  • तुळशी – २४७१

इंधनाचा पुरेसा साठा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आश्वस्त

NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचे असे शिजले कारस्थान

मोदी-शहा देशद्रोही, राहुल गांधींचा घणाघात

भारत-इटली द्विपक्षीय चर्चा; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर भर; २०२९पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य

ट्रम्प यांना सिनेटची वेसण, युद्ध अधिकारांवर मर्यादा