मुंबई

राणा दाम्पत्यांमुळे लाव्ही इमारतीतील रहिवाशांना पालिकेची नोटीस

प्रतिनिधी

राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील लाव्ही इमारतीतील रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावली आहे. इमारतीत नियमबाह्य बांधकाम झाल्याने रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेच्या एच पश्चिम विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पालिकेच्या नोटिसीनंतर राणा दाम्पत्यांनी न्यायालयात धाव घेतली असून, बांधकाम नियमित करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला तूर्तास दिलासा मिळाला आहे.

खार पश्चिम, १४व्या रस्त्यावर ‘लाव्ही’ इमारतीत राणा दाम्पत्याचे घर आहे. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार