एनसीईआरटीतून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; वंशजांची जनहित याचिका दाखल 
मुंबई

एनसीईआरटीतून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; वंशजांची जनहित याचिका दाखल

आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटवण्याच्या ‘एनसीईआरटी’च्या निर्णयाला नागपूरचे राजे मुधोजीराजे अजितसिंगराव भोसले यांच्यासह अन्य नऊ जणांनी ॲड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दाखल घेतली.

Swapnil S

मुंबई : आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटवण्याच्या ‘एनसीईआरटी’च्या निर्णयाला नागपूरचे राजे मुधोजीराजे अजितसिंगराव भोसले यांच्यासह अन्य नऊ जणांनी ॲड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दाखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी ९ डिसेंबरला निश्चित केली आहे.

ॲड. आशीष गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी ही याचिका मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या पुस्तकातील ‘आकृती ३.११’ हा नकाशा हटवला आहे. हा नकाशा इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याची व्याप्ती दर्शवतो. त्यात मराठ्यांचे साम्राज्य तंजावरपासून पेशावरपर्यंत पसरल्याचे दिसते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा