संग्रहित छायाचित्र  
मुंबई

छायाचित्र विटंबना: आव्हाड न्यायालयात

jitendra awhad: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली.

Swapnil S

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली.

न्यायमूर्ती  रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती  पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायलयाने दिले. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केल्याच्या निशेर्धात पुकारण्यात आलेल्या  आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रायगडमधील महाड पोलीस ठाण्यात दोन, तर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात एक असे तीन स्वतंत्र गुन्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी