मुंबई

अंकुश, स्वप्नील, सई, उमेश, हृतिक, शरद केळकर आदी २१ कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी परिपत्रक काढत मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील २१ कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी

राष्ट्रवादीच्या एका नेत्याने काही मराठी तसेच हिंदी अभिनेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात मटका आणि पत्ते खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही काही कलाकार ऑनलाईन रमीची जाहिरात करून लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. राष्ट्रवादी चित्रपट, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. यामध्ये मराठीचे तसेच हिंदीतील आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात मटका किंवा पत्ते खेळण्यावर बंदी घातली आहे. जर गावामध्ये किंवा शहरात अशा प्रकारचे खेळ खेळताना आढळल्यास त्यांच्यावरची कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. पण, ऑनलाईन रमीचा संपूर्ण महाराष्ट्रात अवैध प्रचार केला जातो. या जुगारावर बंधने घालून संबंधित जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पत्रामधून कलाकारांची यादी जाहीर केली आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे,उमेश कामात, संतोष जुवेकर, गौरी नलवडे, आणि अमृता खानविलकर ही नवे आहेत. तर, हिंदीमधून अभिनेते ऋतिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, शक्ती कपूर, आलोक नाथ, रजा मुरदअनुप सोनी, मनोज वाजपेय, अली अजगर, शिशिर शर्मा यांचा सामवेश आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन