संग्रहित चित्र  
मुंबई

नॅशनल पार्कमध्ये यापुढे एकही बांधकाम नको; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला तंबी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Swapnil S

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. आता बस झाले. यापुढे नॅशनल पार्कमध्ये एकही बांधकाम उभे राहणार नाही याची खबरदारी घ्या, अशी तंबी मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठने सरकारला दिली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या काही वर्षांत बेकायदेशीर बांधकामे वाढली असून वाढत्या नागरी वस्त्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याप्रकरणी न्यायालयाने येथील बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते.

मात्र या आदेशाची पूर्तता न झाल्याने कंझर्वेशन ॲक्शन ट्रस्ट या संस्थेने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सोमवारी सविस्तर माहिती द्या

न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. या परिसरातील बांधकामांवर कारवाई करूनही ही बांधकामे पुन्हा उभी राहत आहेत. इतकेच नव्हे तर ती वाढत चालली आहेत. त्याचा परिणाम येथील जैवविविधतेवर होत आहे. याकडे याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. जनक द्वारकादास यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. याची खंडपीठाने दखल घेत राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. तसेच कठोर शब्दांत जाब विचारत याप्रकरणी सोमवारी सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

केंद्राकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना १,५६६ कोटींची मदत; कर्नाटकलाही ३८४ कोटींचा निधी जाहीर

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार; येत्या बुधवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल