मुंबई

भर पावसातही अंधेरी सबवे खुला राहणार

अंधेरी भुयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरांपैकी एक आहे. मोगरा नाल्याच्या उगम स्थळापासून अंधेरी भुयारी मार्गापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीपर्यंत हा नाला वाहत येतो. विशेष म्हणजे नाल्याचा हा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी भूयारी मार्गाकडे येताना तब्बल १३ मीटरचा उतार आहे.

Swapnil S

मुंबई : हलक्या पावसातही अंधेरी सबवे जलमय होतो आणि सबवे बंद करण्यात येतो. मात्र आता भर पावसातही अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. यासाठी मोगरा नाल्याशेजारी आणखी एक नाला बांधण्यात येणार असून या नाल्यातून पावसाच्या पाण्याचा वेळीच निचरा होण्यास मदत होणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.

अंधेरी भुयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरांपैकी एक आहे. मोगरा नाल्याच्या उगम स्थळापासून अंधेरी भुयारी मार्गापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीपर्यंत हा नाला वाहत येतो. विशेष म्हणजे नाल्याचा हा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी भूयारी मार्गाकडे येताना तब्बल १३ मीटरचा उतार आहे. म्हणजेच नाल्याचा प्रवाह हा अत्यंत जोरात येतो. त्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्यास या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणे हे अत्यंत मोठे आव्हान ठरते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा वेळीच निचरा करण्यासाठी मोगरा नाल्याशेजारी आणखी एक नाला बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून पावसाचे पाणी सबवेत शिरणार नाही आणि सबवे वाहतुकीसाठी खुला राहील.

मोगरा नाला पम्पिंग स्टेशन लटकले

गोखले पुलाचे काम संथ गतीने सुरू असून यामुळे मोगरा नाला पम्पिंग स्टेशनचे काम लटकले आहे. गोखले पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय येथील पम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी, जोगेश्वरी व वर्सोवा परिसरात पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश