मुंबई

जुन्या डबलडेकरचे होणार 'जतन' ; बेस्टच्या महाव्यवस्थापकांची माहिती

१५ सप्टेंबर रोजी अंधेरी आगारातील ही बस, आगरकर चौक ते सिप्स या ४१५ क्रमांकाच्या मार्गावर शुक्रवारी रात्री साडे वाजता धावली, ती अखेरची अन् शेवटची फेरी होती.

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईची शान म्हणून बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बसेसची ओळख. जुन्या डबलडेकर बसेसचा लाल रंग, मार्ग व रुट दर्शविणारे ब्लॅक अँड व्हाईट फलक, बस मध्ये मागून चढा अन् मागून उतरा अशी विविध वैशिष्ट्य असलेल्या एका डबलडेकर बसचे जतन करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या डबल डेकर बसला ऐतिहासिक ओळख आहे. ८ डिसेंबर १९३७ साली पहिली दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती. देशभरात केवळ मुंबईच्या रस्त्यांवरून डबल डेकर बसेस धावतात. या बसमधून एकदा तरी प्रवास करायचा अशी प्रत्येकाची खासकरून बच्चे कंपनीची इच्छा होती. मुंबईची शान म्हणून या बसला नेहमीच मुंबईकरांची गर्दी असते. १५ सप्टेंबर रोजी अंधेरी आगारातील ही बस, आगरकर चौक ते सिप्स या ४१५ क्रमांकाच्या मार्गावर शुक्रवारी रात्री साडे वाजता धावली, ती अखेरची अन् शेवटची फेरी होती.

मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या ८६ वर्षांपासून दिमाखात वावरणारी तसेच प्रत्येक मुंबईकरांच्या आठवणींचा एक भाग असलेल्या जुन्या डबलडेकर बसचे जतन करण्यात यावे, अशी मागणी ब्रेस्ट प्रेमींनी लावून धरली होती. बेस्ट उपक्रम, मुख्यमंत्री, राज्य सरकार आदीकडे बेस्ट प्रेमींनी पाठपुरावा सुरू केला. अखेर बेस्ट उपक्रमाने जुन्या डबलडेकर बसचे जतन करण्याचा निर्णय घेतला हा स्वागतार्ह निर्णय आहे.

- शुभम पाडावे , बेस्ट प्रेमी

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला