मुंबई

Mumbai Metro: सर्व मेट्रो तिकिटासाठी आता एकच ॲप; एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येणार

मुंबई महानगरात मेट्रो जाळे विस्तारत असून, प्रवाशांना आता मेट्रो १ कंपनीच्या ‘ऑनतिकीट (ONTICKET)’ ॲपवरून विविध मेट्रो प्रकल्पांचे तिकीट एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात ४ मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एकाच ‘ॲप’वरून विविध मेट्रोचे तिकीट घेण्याची सुविधा मेट्रो १ कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी मेट्रो १ ने ऑनतिकीट (ONTICKET) ॲप सुरू केले आहे.

सध्या ७० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क मुंबई शहर आणि उपनगरात उपलब्ध झाले आहे. येत्या महिन्यात आणि वर्षभरात मेट्रोचे नेटवर्क सुमारे २७० कि.मी.पर्यंत निर्माण होणार आहे. भविष्यात हे मेट्रो नेटवर्क ३४० कि.मी.पर्यंत होणार आहे. या मार्गावरून एकाच मोबाईल अॅपच्या माध्यमातून तिकीट घेण्याची सुविधा मेट्रो १ ने उपलब्ध करून दिली आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १, अंधेरी पूर्व ते दहिसर मेट्रो ७, दहिसर ते डीएन नगर मेट्रो २ अ, कुलाबा वांद्रे-जेव्हीएलआर मेट्रो ३ मार्गावरील काही स्थानकापर्यंत मेट्रो सेवा सुरू आहे.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड