मुंबई

पार्टी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक ; २७ लाखांचा एमडीएमए, चरसचा साठा हस्तगत

नवशक्ती Web Desk

पार्टी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला वरळी युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे २७ लाख रुपयांचा एमडीएमए आणि चरसचा साठा हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने मंगळवार ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमडीएमए हे पार्टी ड्रग्ज म्हणून परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले. दादर येथे काही जण ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी दादरच्या डॉ. रत्नाकर भैंडकर मार्ग, रोझव्हिला इमारतीजवळ साध्या वेशात पाळत ठेवून एका २६ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १६ लाख २६ हजार रुपयांच्या ११५ एमडीएमए गोळ्या, १० लाख ६२ हजार रुपयांचे ३५४ ग्रॅम वजनाचे चरस सापडले. या ड्रग्जची किंमत सुमारे २७ लाख रुपये आहे.

तपासात आरोपी हा मालाडच्या एका कॉल सेंटरमध्ये कामाला असून गेल्या एक वर्षांपासून ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सक्रिय असल्याचे समोर आले. यापूर्वीही त्याने ड्रग्जची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याला ते ड्रग्ज कोण देत होते, तो ड्रग्ज कोणाला विक्री करत होता, याचा आता पोलीस तपास करत आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस