मुंबई

बंगला बुकिंगच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

आकाश रुपकुमार जाधवानी असे या ठगाचे नाव असून त्याच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिनिधी

मुंबई : बंगला बुकिंगच्या नावाने एका आर्थिक सल्लागाराची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर ठगाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. आकाश रुपकुमार जाधवानी असे या ठगाचे नाव असून त्याच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे बोलले जाते. यातील तक्रारदार आर्थिक सल्लागार असून त्यांच्या मालकीची विलेपार्ले परिसरात एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीत ते पार्टनर म्हणून काम करतो. जुलै महिन्यांत त्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी लोणावळा येथे एका पिकनिकची आयोजन केले होते. त्यासाठी त्यांना एका भाड्याच्या बंगल्याची गरज होती. त्यासाठी प्रयत्न सुरु असताना त्यांना सोशल मिडीयावर अरिहंत बंगल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे फोन करुन त्यांना दोन दिवसांसाठी बंगला भाड्याने हवा आहे असे सांगितले होते. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना ऐंशी हजार भाडा असल्याचे सांगून बुकींगसाठी आधी पन्नास हजार रुपये जमा करावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून त्याने दिलेल्या बँक खात्यात ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ४ ऑगस्टला त्यांना बुकींग करणार्‍या व्यक्तीचा फोन आला. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे बुकींग रद्द झाले असून दोन दिवसांत बुकींगची रक्कम परत करतो असे सांगितले. मात्र त्याने ती रक्कम पाठविली नाही. त्यामुळे त्यांनी बोरिवलीतील संबंधित कंपनीशी संपर्क साधून बंगल्यासाठी दिलेल्या पैशांविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी त्यांचे कुठलेही बुकींग झाले नसून त्यांची फसवणुक झाल्याचे सांगितले. हा प्रकार लक्षात येताच २६ सप्टेंबरला त्यांनी विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह मोबाईल क्रमांकावरुन पोलिसांनी आकाश जाधवानी याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात आकाश हा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने पोलिसांशी हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावले; Video शेअर करत विरोधकांचा गंभीर आरोप

Mumbai : पाहुण्या वक्त्यावर लैंगिक छळाचा आरोप; सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

सर्व निकाल २१ डिसेंबरला; "पहिल्यांदाच असं घडतंय", मतमोजणीच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज

"संचार साथी ॲपची सक्ती म्हणजे देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न"; काँग्रेसचा हल्लाबोल

मोठी बातमी! मतमोजणीचा संभ्रम दूर; सर्व ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रच जाहीर होणार, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय