मुंबई

‘ट्रेड सर्टिफिकेट’ न केलेल्या वाहनांच्या तपासणीचे आदेश

तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय मोटार वाहन कायदा व  व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठान, शोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

मेसर्स ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट घेऊन राज्यातील विविध ठिकाणी 'शोरूम व स्टोअर कम सर्व्हिस सेंटर'  उभारण्यात आले असल्याबाबतची तक्रार ‘प्रीतपाल सिंग अँड असोसिएट’ गुरुग्राम, यांनी केली आहे. या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई, ३४ वाहने जप्त

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य, पश्चिम, पूर्व), बोरिवली व पुणे  या कार्यालयाच्या अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवून ' ट्रेड सर्टिफिकेट'बाबत ३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Mumbai : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! विधान भवन मेट्रो स्थानकावर ए-२ गेटवरील लिफ्ट सुरू; ज्येष्ठ नागरिकांना मोठी सोय

Maharashtra Infra Update: JNPT ते मुंबई-पुणे-गोवा मार्ग जोडणाऱ्या प्रकल्पाला गती; १६ एप्रिलपासून टेंडर प्रक्रिया

Mumbai : निसर्ग उन्नत मार्ग महागला; ७५० रुपयांत मासिक पास योजना, विदेशी पर्यटकांसाठी ३ हजार फी

ठाणे-मुलुंडदरम्यानच्या नव्या स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव; TMC बैठकीत ठराव मंजूर

Mumbai : चेंडू आणण्यासाठी गेला अन् काळाने घाला घातला; मालाडमध्ये ८ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू