मुंबईकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागांवर परिणाम, वाचा महत्त्वाची माहिती  
मुंबई

मुंबईकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागांवर परिणाम, वाचा महत्त्वाची माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पाली हिल जलाशयाकडे जाणाऱ्या ९०० मिमी इनलेट पाइपलाइनमध्ये गळती झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम घेतले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पाली हिल जलाशयाकडे जाणाऱ्या ९०० मिमी इनलेट पाइपलाइनमध्ये गळती झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम घेतले आहे. ही दुरुस्ती
मंगळवार, १० फेब्रुवारीला सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत केली जाणार आहे. या काळात खार आणि बांद्रा परिसरातील अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, तर काही भागांत कमी दाबाने पाणी येईल.

दुरुस्ती कुठे होणार?

बांद्रा पश्चिम-कुरेशी नगर झोपडपट्टीजवळील खुल्या म्हाडा प्लॉटमधील जलवाहिनी आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगतच्या काही भागात दुरुस्ती केली जाणार आहे.

बीएमसीचे नागरिकांना आवाहन

  • दुरुस्तीपूर्वी पुरेसे पाणी साठवून ठेवा.

  • कामाच्या काळात पाण्याचा वापर जपून करा.

  • पुढील काही दिवस पाणी उकळून आणि गाळून प्या.

कोणत्या भागांत पाणीपुरवठा पूर्ण बंद?

बांद्रा पश्चिम

हिल रोड, पेरी रोड, मॅन्युएल गोंसाल्व्हेस रोड, सेंट अँड्र्यूज रोड, सेंट पॉल रोड, कार्टर रोड, पाली व्हिलेज, चिंबई व्हिलेज, शर्ली व्हिलेज, कांतवाडी परिसर

खार पश्चिम

खार दांडा, कोळीवाडा, दांडा पाडा, चुईंम गाव, गझदार बांध झोपडपट्टी, खार पश्चिमेतील काही भाग

बांद्रा-खार परिसरातील इतर भाग

हनुमान नगर झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, कार्टर रोड, युनियन पार्क (रोड क्र. १ ते ४), पाली हिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर, पाली पठार झोपडपट्टी, १५ ते २० नंबर रस्ते (खार),
चॅपेल रोड, व्हेरोनिका रोड, डॉ. पीटर डायस रोड, सेंट जॉन द बॅप्टिस्ट रोड, माउंट मेरी कॅथेड्रल व परिसर, के. सी. रोड, एल. के. मेहता रोड, बाजार रोडचे काही भाग, ए. के. वैद्य रोड, झिगझॅग रोड, नरगिस दत्त रोड, पाली माला रोड

कमी दाबाने पाणी येणारे भाग

हिल रोडच्या शेवटापासून ताज लँड्स एंडपर्यंतचा परिसर, बी. जे. रोड, एच. के. भाभा रोड, डॉ. काणे रोड, गणेश झोपडपट्टी परिसर या भागांना मध्यरात्रीनंतर पहाटे १ ते ४.३० वाजेपर्यंतच पाणीपुरवठा मिळेल.

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

रायगडावर प्री-वेडिंग शूटमुळे वाद; शिवसमाधी परिसरातील व्हिडीओ व्हायरल

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

IPL 2026 : चिन्नास्वामीत गोलंदाजांचा कस; बंगळुरू-लखनऊमध्ये आज लढत; फलंदाजांकडून धावांचा वर्षाव अपेक्षित

खरातशी कोणताही संबंध नाही; २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांचा खुलासा