मुंबई

वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती; यंदा प्रवासी संख्येसह महसुलात वाढ

Swapnil S

मुंबई : आरामदायी व गारेगार प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी वातानुकूलित लोकल सेवा सुरू केली. गेल्या वर्षीच्या तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार प्रवाशांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२३ या तीन महिन्यात ४२ लाख १८ हजार ३८९ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. तर जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२४ या तीन महिन्यात ५२ लाख ०७ हजार ४७६ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येसह महसुलात वाढ झाली आहे.

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ८० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यापैकी ५० लाखांहून अधिक प्रवासी मध्य व हार्बर मार्गावर प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सेवेत वातानुकूलित लोकल सेवा सुरू केली. मध्य रेल्वेच्या ताफ्यात पाच लोकल असून दररोज ६६ फेऱ्या होतात. सीएसएमटी-बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, टिटवाळा, ठाणे स्थानकांदरम्यान एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत धावतात. वातानुकूलित लोकलला प्रतिसाद मिळत असून तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येसह महसुलात वाढ झाली आहे.

प्रवासी संख्या व महसुलात वाढ

महिना - प्रवासी - महसूल

  • जानेवारी - १३,४९,४३० - ५,८१,७६,८८०

  • फेब्रुवारी - १३,५०,२९९ - ५,९४,९९,४००

  • मार्च - १५,१८,६६० - ६,७३,०६,५३५

महिना - प्रवासी - महसूल

  • जानेवारी - १९,५६,७८१ - ८,३७,२४,८३५

  • फेब्रुवारी - १८,८४,२७० - ८,१७,९४,३२५

  • मार्च - १३,६६,४२५ - ५,७७,८५,१६५

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!

Nashik : "छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करतायेत", शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

Lok Sabha Elections 2024: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मूसा अमोल कीर्तिकरांच्या प्रचारात? व्हिडिओ व्हायरल

"आदित्य ठाकरेंच्या कपाळावरही लिहिलंय, मेरा बाप...", प्रियांका चतुर्वेदींच्या 'त्या' वक्तव्यावर संजय निरुपम यांचे प्रत्युत्तर

'४ वाजेपर्यंत कामावर या, अन्यथा...' : AI Express ने 'सिक लिव्ह' घेणाऱ्या ३० जणांना काढून टाकले; इतरांना अल्टिमेटम पाठवले