मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय २०१७ मध्ये दाखल झालेल्या पेंग्विनमुळे महसुलात २० वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षात देशविदेशातील ६५ लाख २५ हजार ५०० पर्यटक भेट दिली असून यामुळे प्रशासनाला तीन वर्षात ३५ कोटी ३६ लाख महसूल मिळाल्याचे राणी बाग प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात मार्च २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून या ठिकाणी पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज नऊ ते दहा हजार, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंधरा ते सोळा हजार असणारी पर्यटकांची संख्या आता ३० ते ४० हजारांच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे.
असे वाढले उत्पन्न
१ एप्रिल २०१६ ते मार्च २०१७या कालावधीत या कालावधीत १३ लाख ८० हजार २७१ पर्यटक आले. त्यामुळे ७३ लाख ६५ हजार ४६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
१ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २८ लाख ५९ लाख १६ पर्यटक आले. यामुळे उद्यानाला ११ कोटी १५ लाख ३ हजार ७७६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
२०२३ मार्च ते २०२४ मार्च या वर्षात २८ लाख ९७ हजार ६०० पर्यटकांनी पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवली आणि पालिकेच्या तिजोरीत ११ कोटी ४६ लाख ९७हजार ६०० रुपये उत्पन्न मिळाले.
२०२५ ऑक्टोबरपर्यंत १० लाख ५१ हजार ६०० पर्यटकांनी भेट दिल्याने ४ कोटी ७४ लाख तिजोरीत जमा झाले. एकूण तीन वर्षांत ३५ कोटी ३६ लाख महसूल मिळाला.
तिकिटाचे दर परवडणारे
उद्यानात प्रवेशासाठी प्रति व्यक्ती रुपये ५० रुपये शुल्क असून ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी रुपये २५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. आई-वडील आणि १५ वर्षांपर्यंतची २ मुले अशा ४ व्यक्तींच्या कुटुंबासाठी १०० रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते. आम्हाला याठिकाणी वारंवार यायला आवडत असल्याची प्रतिक्रिया येथे आलेल्या श्रीकांत साटम यांनी दिली.