मुंबई

व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून आमदार प्रकाश सुर्वेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून प्रकाश सुर्वे यांनी निवेदन जारी केले

प्रतिनिधी

गेले काही दिवस सुरु असलेल्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून आता आमदार प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणावरून प्रकाश सुर्वे गप्प का? असा सवाल विरोधकांनी केला होता. आमदार प्रकाश सुर्वे यांनी या सर्व प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली असून विरोधकांवर टीकादेखील केली आहे. या निवेदनामध्ये ते म्हणाले आहेत की, "मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र, सदर प्रकरणावर मी काही बोलत नाही, म्हणून चुकीचे अर्थ काढून अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे मी हे निवेदन देतो आहे." असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

या निवेदनात ते म्हणाले आहेत की, "मी १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड रुग्णालयात दाखल होतो. मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असून सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होतो आहे. मात्र मी काही बोलत नाही असे चुकीचे अर्थ काढून अपप्रचार केला जात आहे. शीतल म्हात्रे या मला बहिणीसमान आहेत. व्हिडिओमध्ये गाणे लावून व्हायरल करणे, हा महिलांचा अपमान आहे. या घडलेल्या प्रकारामुळे मनस्ताप झाला, माझे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न आहे" असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच, या निवेदनात ते म्हणाले आहेत की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाच्या धडाक्यामुळे राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीओ मॉर्फकरणे, खोटे चारित्रहनन करणे, अशा विकृत गोष्टी करत आहेत," असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच, "या सर्व प्रकारामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास झाला आहे," असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला