मुंबई

ज्येष्ठ साहित्य समीक्षक प्रा. विजय तापस यांचे निधन

ज्येष्ठ मराठी नाट्य व साहित्य समीक्षक, इतिहासकार आणि संशोधक प्रा. विजय तापस यांचे रविवारी सकाळी ११ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

Swapnil S

मुंबई : ज्येष्ठ मराठी नाट्य व साहित्य समीक्षक, इतिहासकार आणि संशोधक प्रा. विजय तापस यांचे रविवारी सकाळी ११ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस व कन्या डॉ. शाब्दा तापस असा परिवार आहे.

प्रा. तापस यांनी दीर्घकाळ मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात मराठी विभागात अध्यापन केले आणि त्याबरोबरच महाविद्यालयाच्या इतिहासाचे लेखनही केले. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारे लेखन करण्याचा प्रयोग त्यांना करता आला.

मराठी नाट्य समीक्षा, मराठी नाटकांचा इतिहास, मराठी नाटकाचे सामाजिक अन्वयन आणि जागतिक रंगभूमीवरील विविध प्रयोग यावर त्यांनी विपुल लेखन, संशोधन केलं होतं, तसेच लोकसत्ता, सामना, महानगर यासारखी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून सातत्याने स्तंभलेखन केले होते. त्यांनी संपादित केलेली पुस्तके हा संपादनाचा वस्तुपाठ मानली जातात.

संशोधनावर आधारित अभ्यासपूर्ण लेखन आणि त्यातून सामाजिक दस्तावेजीकरण हे त्यांचं मोठे वैशिष्ट्य. नव्या-जुन्यातील जे जे उत्तम ते स्वीकारून अभ्यासोनी प्रगटावे हे त्यांचे वैशिष्ट्य. कविता हा त्यांच्या विशेष आवडीचे विषय. यातूनच त्यांनी माया अँजेलोच्या कवितांचा भावानुवाद केला, तर एकीकडे शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे मराठी रूपांतर केले. प्रा. तापस हे विविध सामाजिक संस्थांशी आणि आपल्या कामाच्या माध्यमातून मराठी नाट्यसृष्टी व माध्यमांशी जोडलेले होते.

"आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर..."; पुण्यात अजित पवारांच्या NCP सोबत का नाही लढणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट

BMC Election : मुंबईत महायुती एकत्र लढण्यास सज्ज; मविआत मनसेवरूनच मतभेद

व्हीसी बैठकीआधी मुख्यमंत्र्यांची परवानगी बंधनकारक; मुख्यमंत्री कार्यालयाचे मंत्री, अधिकाऱ्यांना निर्देश

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

प्राथमिक चौकशीसाठी महिन्यांमागून महिने का घालवता? हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी