सरकारी कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो; ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले  
मुंबई

सरकारी कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो; ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयात सन्मानाने लावण्यात येतात. याच धर्तीवर शासकीय, निमशासकीय पालिका कार्यालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा लावण्यात याव्यात याकडे नगरसेविका लीना पटेल-देहेरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Swapnil S

मुंबई : महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयात सन्मानाने लावण्यात येतात. याच धर्तीवर शासकीय, निमशासकीय पालिका कार्यालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा लावण्यात याव्यात याकडे नगरसेविका लीना पटेल-देहेरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

लोकशाही परंपरेनुसार आणि प्रशासकीय शिष्टाचाराचा भाग म्हणून, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब, आंबेडकर यांच्या प्रतिमा सन्मानाने लावण्यात येतात. राज्याच्या सर्वोच्च कार्यकारी नेतृत्वाचे प्रतीक म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे संपूर्ण प्रशासनाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना, धोरणे व विकास कामे राबविण्यात येतात. तथापि, राज्यातील प्रशासन व्यवस्था अधिक प्रभावी व एकसंध ठेवण्यासाठी शासनाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे प्रतीक म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा लावण्याबाबत एकसंध धोरण अस्तित्वात नसल्यामुळे त्यांच्या प्रतिमा लावण्याबाबत प्रशासनामध्ये एकरूपता दिसून येत नाही. महापुरुषांच्या धर्तीवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमादेखील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था आणि पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये लावण्यात याव्यात, अशी ठरावाची सूचना देहेरकर यांनी मांडली आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड