मुंबई

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी द्या - राज ठाकरे

उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे, निराधार आणि बेघर लोकांचे होत असल्याने त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या विविध भागात सध्या उष्णतेची लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांना आताच उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

तसेच या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे, निराधार आणि बेघर लोकांचे होत असल्याने त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा, असे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. हवामान खात्याने कडक ऊन आणि वाढत्या तापमानाबाबत इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट टाकून शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली आहे. गेले काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर, कोकण या भागात दिवसाचे सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेले आहे. उष्णतेची लाट आली आहे, असे जाहीर झाले आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावे लागत आहे. याबाबतीत, सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्राणी, पक्ष्यांसाठी पाण्याची तजवीज करा

तसेच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे. त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले, तर एकूणच लोकांना त्यांच्या कामाचे नियोजन करता येईल. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसेच या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे (राजकीय नव्हेत), निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा. प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलेरीत, गच्चीत पाणी ठेवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग