मुंबई

Mumbai : राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले आणि चर्चा केली. महापालिका निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले होते. निवडणूक संपताच राज यांनी शिंदेंची भेट घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राज ठाकरे बुधवारी दुपारी अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी शिंदेंनी राज ठाकरेंचा सत्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला त्यांनी लक्ष्य केले होते. शिवाय, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीसाठी राज यांनी महायुतीचे नेते आणि त्यातही एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी बंद कराव्यात, असा सूर ठाकरे गटाकडून आळवला गेला होता. मात्र, पालिका निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा