मुंबई

महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांची मारहाण; राजावाडी रुग्णालयातील प्रकार

घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात दोन महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांनी फरशीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Swapnil S

मुंबई : घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात दोन महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांनी फरशीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजावाडी रुग्णालयात खुप दिवसांपासुन गर्दुल्ले फिरत आहेत. बरेचदा टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान महिला सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गटाचे शिव आरोग्य सेनेने निषेध केला आहे.

आरोपींना लवकरात लवकर अटक करून शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, सचिन भांगे यांनी केली आहे.

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

रेल्वेच्या AC डब्यात चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशाचा VIDEO चर्चेत; अशी चूक करू नका; प्रवासात 'या' वस्तू आहेत बॅन!

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video