मुंबई

आचारसंहितेत अडकले राणीबागेतील मत्स्यालय; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाच्या निविदा प्रक्रियेस पाच कंपन्यांचा प्रतिसाद

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यानात लवकरच काचेच्या टनेलमधून देशविदेशी रंगबेरंगी माशांसह पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवता येणार आहे. साडेपाच हजार चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय राणीबागेत उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पाच कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने पुढील प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याने निवडणुकीनंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल, असे प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यानात लवकरच काचेच्या टनेलमधून देशविदेशी रंगबेरंगी माशांसह पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवता येणार आहे. साडेपाच हजार चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय राणीबागेत उभारण्यात येणार आहे. तर पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची संख्या वाढल्याने आणखी मोकळी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्यास पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र आचार संहिता लागू असल्याने पुढील प्रक्रिया राबवणे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

राणीबाग व प्राणीसंग्रहालय हे देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या प्राणीसंग्रहालयात २५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्र बलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्यांचेही राणीबाग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. राणीबागेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुट्टी व शनिवार व रविवारी तर पर्यटकांचा आकडा ३५ ते ४० हजारांपर्यंत जातो. त्यात आता साडेपाच हजार चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. यात एक टनेल १४ मीटर तर दुसरे टनेल ३६ मीटर लांब असणार आहे. त्यातच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत जाईल. त्यामुळे राणीबागेतील प्राणी-पक्ष्यांची तसेच पेंग्विनची धम्मालमस्ती अनुभवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हजर होतील.

पेंग्विन कक्षाचा विस्तार!

२६ जुलै २०१६ मध्ये कोरियावरून ८ होबोल्ट पेंग्विन आणले होते. राणी बागेतील पेंग्विन आता बच्चेकंपनीसह मोठ्यांचे आकर्षण ठरत आहे. गेल्या ८ वर्षांत पेंग्विनची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे. पेंग्विनसाठी सध्या २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. परंतु पेंग्विनची संख्या वाढत असल्याने त्यांना जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पेंग्विन कक्षाशेजारी उपलब्ध जागेत ६० चौरस मीटरने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पेंग्विन खेळण्याबागड्यासाठी २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे.

दोन टनेल

एक - १४ मीटर - दुसरं - ३६ मीटर

  • पारदर्शक काचा

  • पेंग्विन कक्षाच्या समोर उभारणार

  • देशी-विदेशी रंगबेरंगी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी