मुंबई

मध्य रेल्वेवर ६ महिन्यात ४.२३ युटीएस अँप युजर्सची नोंद

कोरोनानंतर प्रवाशांकडून डिजिटल आणि पेपरलेस तिकीट बुकिंगला प्राधान्य

प्रतिनिधी

प्रवाशांचा सुख सुविधांसाठी तत्पर असलेल्या मध्य रेल्वेचा युटीएस अ‍ॅप युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च मध्ये ३६ हजार प्रवाशानी युटीएस अँपद्वारे तिकीट काढले होते. सहा महिन्यानंतर अँपद्वारे प्रवाशांनी ७४ हजार तिकीटांचा टप्पा पार केला आहे. दैनंदिन सरासरी प्रवासी मार्चमध्ये २.१७ लाखवरून सप्टेंबरमध्ये ४.२३ लाख एवढे दुप्पट झाले आहे. कोरोनानंतर प्रवाशांकडून डिजिटल आणि पेपरलेस तिकीट बुकिंगला प्राधान्य देण्यात येत असल्याने युटीएस अँपचा सर्वाधिक वापर होत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईची लाइफलाईन आणि चाकरमानी यांचे अतूट नाते आहे. मात्र दररोजची प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत मध्य रेल्वे प्रशासनाचे कमी पडणारे मनुष्यबळ यासाठी मध्य रेल्वेने युटीएस मोबाईल अँपची निर्मिती केली. यामुळे प्रवाशांचा वेळ, तिकीट खिडक्यांवर लांबचा लांब रांगा यातून सुटका झाली असून मोबाईल अँपद्वारे प्रवाशांची तिकीट खरेदी सोयीस्कर आणि जलद गतीने होत आहे. कोरोनानंतर सामाजिक अंतर ठेवत तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑनलाईन रेल्वे तिकिटांबाबत प्रवाशांना आवाहन केले. त्यानुसार ऑनलाईन रेल्वे तिकीट खरेदीला प्रवाशांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. मागील ६ महिन्यात ४ लाखांहून अधिक प्रवाशांनी या अँपचा वापर केला असून याद्वारे ७४ हजार ऑनलाईन तिकिटांची खरेदी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी