मुंबई

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट! गुरुवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर

प्रतिनिधी

मुंबई : भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवारी सुटी जाहीर केली आहे. सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने बुधवारी दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र रात्री ८ वाजल्यापासून गुरुवारी दुपारपर्यँत ऑरेंज अलर्टचे रेड अलर्टमध्ये रूपांतर झाले. मुंबईत या कालावधीत अतिमूसळधार पाऊस कोसळणार असल्याने पालिकेने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पालिकेने या पार्श्वभूमीवर आपली यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस