मुंबई

मुंबईत कुष्ठरोगाचा धोका; सर्वेक्षणातून ८१ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई कुष्ठरोग मुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवत राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहिम हाती घेतली होती

गिरीश चित्रे

मुंबईत कुष्ठरोग निर्मूलनासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान शोध मोहिम हाती घेतली होती. या शोध मोहिमेत तब्बल ३२ लाख ७४ हजार ८८ जणांची तपासणी केली असता ८१ नवीन कुष्ठरोग रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या कुष्ठरोग निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

मुंबई कुष्ठरोग मुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवत राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहिम हाती घेतली होती. या शोध मोहिमेत ३२ लाख ७४ हजार ८८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ८,५०९ संशयीत आढळले असून त्यापैकी ८१ जणांना कुष्ठरोगाचे निदान झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

भारतात अश्लील अन् हिंसक कंटेंटला लगाम; मेटाकडून Instagram च्या रिकमेंडेशन सिस्टीममध्ये बदल

मुंबईकरांनो, टॅक्सीचालकांची मनमानी आता थांबणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांवर सुरू होणार प्रीपेड टॅक्सी सेवा

मोठा अनर्थ टळला! Indigo विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच पायलटने धोका ओळखला; इमर्जन्सी ब्रेक दाबला अन् २२९ प्रवासी वाचले

आंध्र प्रदेशात ONGC च्या विहिरीतून मोठी गॅसगळती; १ किमी परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, Video

Pune : भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद