Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) जोरदार विजय मिळवत तब्बल २०२ जागांवर आपली छाप पाडली. विरोधकांसाठी हा निकाल धक्कादायक ठरला असून महाआघाडीच्या पराभवाने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...
Published on

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) जोरदार विजय मिळवत तब्बल २०२ जागांवर आपली छाप पाडली. विरोधकांसाठी हा निकाल धक्कादायक ठरला असून महाआघाडीच्या पराभवाने राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पराभवानंतर सर्वाधिक चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात निर्माण झालेली भीषण फूट. यादव कुटुंबातील कलह आता थेट सोशल मीडियावर उफाळून आला असून लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी गंभीर आरोप केले आहेत.

रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप

बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर रोहिणी आचार्य यांची आरोपांची मालिका सुरूच आहे. त्यांनी X वर आणखी एक पोस्ट करत म्हंटल, "काल एका मुलीला, बहिणीला, लग्न झालेल्या महिलेला, आईला अपमानित केलं गेलं. घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. मला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. मी माझ्या आत्मसन्मानासोबत तडजोड केली नाही. सत्याचा त्याग केला नाही. याच कारणाने मला अपमान झेलावा लागला."

अशी मुलगी जन्माला येऊ नये

पुढे त्या म्हणाल्या, "काल एक हतबल मुलगी रडत आई, वडील, बहिणीला सोडून आली. माझं माहेर माझ्यापासून तोडलं गेलं, मला अनाथ बनवण्यात आलं. तुम्ही कधीही माझ्या रस्त्यावर चालू नका, कोणत्याच घरी रोहिणीसारखी मुलगी, बहीण जन्माला येऊ नये.”

रोहिणी आचार्य यांची आरोप करणारी ही दुसरी पोस्ट आहे. या आधी त्यांनी शनिवारी पोस्ट करत कुटुंब आणि राजकारणाचा त्याग करण्याची घोषणा केली होती. पराभवाचा दोष त्यांनी स्वत: वर घेतला असून यामध्ये त्यांनी संजय यादव आणि रमीझ यांनी हे करायला सांगितल्याचे म्हंटले होते.

यादव घराण्यातील वाद अधिक गंभीर

महाआघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर यादव कुटुंबात निर्माण झालेला कलह अधिक चिघळत असल्याचे दिसत आहे. आरजेडीची ओळख अनेक वर्षांपासून यादव घराण्याच्या नेतृत्वावर आधारित आहे. रोहिणींच्या पोस्टनंतर यादव घराण्यातील वाद अधिक गंभीर झाल्याचं स्पष्ट आहे. या प्रकरणावर आरजेडीचे काय पाऊल असेल आणि याचा पक्षराजकारणावर काय परिणाम होईल, याकडे संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in