झारीतील शुक्राचार्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; महापौर रितू तावडे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट 
मुंबई

झारीतील शुक्राचार्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; महापौर रितू तावडे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

रितू तावडे यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भाजपमधीलच नेत्यांकडून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी जोरदार चर्चा मुंबई महापालिका वर्तुळात सुरू आहे. जाणूनबुजून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असून झारीतील शुक्राचार्य कोण? याचा शोध घेणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

Swapnil S

मुंबई : रितू तावडे यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भाजपमधीलच नेत्यांकडून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी जोरदार चर्चा मुंबई महापालिका वर्तुळात सुरू आहे. जाणूनबुजून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असून झारीतील शुक्राचार्य कोण? याचा शोध घेणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत झारीतील शुक्राचार्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

महापौर कार्यालयाच्या व्यवस्थापनेसाठी २५ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, महापौरांच्या वाहनांवर लुकलुकणारे दिवे, महेश ट्युटोरियलचे संचालक डॉ. श्रेणिक कोटेचा यांची मुंबई महापालिकेच्या शाळांमधील नव्या शैक्षणिक उपक्रमांसाठी मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करा, असे पत्र शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना दिले.

जाणूनबुजून टार्गेट केले जात असल्याचा आरोप

अखेर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक बोलावली. अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली दादर वसंत स्मृती येथे झालेल्या बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यात ‘तू तू मैं मैं’ झाल्याचे समोर आले. अखेर महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईशी निगडीत विविध प्रश्नांवर महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा केल्याचे सांगण्यात आले तसेच मलाच जाणूनबुजून टार्गेट केले जातंय याचीही तक्रार महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे भाजपमधील गोटातून सांगण्यात आले.

सहाय्यक आयुक्तांकडे जनसंपर्क विभाग

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, जनसंपर्क अधिकाऱ्याची बदली करण्याऐवजी महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताकडे जनसंपर्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय चर्चेत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

IDBI Bank Privatisation: मोठी बातमी! IDBI बँकेतील हिस्सा फेअरफॅक्सला विकणार; तब्बल ५२,८७८ कोटी रुपयांची डील

विलेपार्ले स्थानक परिसर होणार रुंद; सांताक्रूझमधील अतिक्रमणे हटवणार, अश्विनी भिडेंचे 'पादचारी प्रथम'अभियानांतर्गत निर्देश

Mumbai : तीन डोमिनोज आऊटलेट्ससह १७ खाद्य परवाने निलंबित

Mumbai : स्क्रीन टाईम, जंक फूडमुळे बाल लठ्ठपणा वाढतोय; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० प्रकरणे नोंदवली