मुंबई

दहीहंडी उत्सवात रस्ते बंद बेस्ट बस मार्गांत बदल; रस्ते वाहतूक मंदावली

बसमार्ग ६४ च्या बस गाड्या सकाळी १० पासून काळा चौकीपर्यंत खंडित करण्यात आलेल्या होत्या

नवशक्ती Web Desk

मुंबई : दहिहंडी उत्सवात मुंबईतील रस्त्यांवर मंडप उभारण्यात आले. यामुळे रस्ते वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली होती. बेस्टच्या बसेसचे मार्ग वळवण्यात आले होते. मुंबई शहरासह उपनगरातील दहिहंडी उत्सवामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता.

दहीहंडी उत्सवामुळे भांडुप स्थानक पश्चिम ते टेंभीपाडा दरम्यान धावणारी ६०५ ही बस नरदास नगर येथे रात्री १ वाजल्यापासून खंडित करण्यात आली. वांद्रे पश्चिम येथील शांताराम हरी केळकर चौकात दहीहंडी कार्यक्रम असल्याने बसमार्ग क्रमांक ८० म , ए ३७५,४७३,सी ५०५ अप दिशेत वांद्रा टॉकीज मोती महल भाभा रुग्णालय मार्गे ७ वाजल्यापासून दिवसभरासाठी परावर्तित केले होते. काळाचौकी येथील रामभाऊ भोगले मार्गावर दहीहंडी निमित्त म्हाडा कॉलनी येथे स्टेज बांधल्यामुळे बसमार्ग ६४ च्या बस गाड्या सकाळी १० पासून काळा चौकीपर्यंत खंडित करण्यात आलेल्या होत्या .

चुनाभट्टी फाटक येथे दहीहंडी असल्याने बस मार्ग क्रमांक ए ५ , ए ८५ व ३५५ म . दोन्ही दिशेत सकाळी ११ वाजल्यापासून चुनाभट्टी ऐवजी वसंतराव नाईक मार्गाने परावर्तित केले होते. दहिहंडा उत्सव साजरा होत असल्याने पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर हा वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अप आणि डाऊन दिशेमध्ये बस मार्ग क्रमांक. ए ३७७ ए ३७९ व ए ३७७ हे सकाळी ११ वाजल्यापासून जिजामाता भोसले मार्गावरून प्रवर्तित करण्यात आले होते. दहीहंडी मुळे भांडुप स्थानक पश्चिम ते नरदास नगर दरम्यान चालणारे बस मार्ग क्रमांक ६०५ व ६०६ चे प्रवर्तन सकाळी ११ वाजल्यापासून अशोक केदारी चौकात खंडित केले होते.

जुहू येथील हरे राम हरे कृष्ण मंदिर येथे भाविकांची गर्दी झाल्याने वाहतूक पोलिसांनी संत ज्ञानेश्वर मार्ग, मुक्तेश्वर देवालय मार्ग तसेच देवळे मार्ग वाहतुकीसाठी अप व डाऊन दिशेत बंद केल्याने बस मार्ग अंधेरी स्थानक पश्चिम ते मोरा गाव जुहू दरम्यान धावणारी बस क्रमांक ६२७ चे प्रवर्तन जुहू बस स्थानक येथे खंडित करण्यात होते. त्यामुळे या बस मार्गावरील अप व डाऊन दिशेतील सात बस थांबे सकाळी ११ . ४० वाजल्यापासून तात्पुरते रद्द करण्यात आले होते. परंतु हे बस मार्ग प्रवर्तन उद्यापासून पूर्ववत होईल.

प्रभादेवी पश्चिम येथील फितवाला मार्गावर दहीहंडी असल्याने बस मार्ग क्रमांक १६७ संत रोहिदास चौक येथे १२ वाजल्यापासून खंडित केला होता . शिवाजी नगर येथील बाजीप्रभू देशपांडे मार्गावर गोविंदा पथक आल्यामुळे बस मार्ग क्रमांक ८ म व ए ३७९ हे बेंगनवाडी ऐवजी शिवाजीनगर आगारातून दुपारी १२ नंतर चालविण्यात येत होते. धारावी येथील मेनन रोड (९० फीट रोडवर )गोविंदा पथक आल्यामुळे बस मार्ग क्रमांक १७६ , व ४६३ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाने सायन कडे परावर्तित करण्यात आले. चेंबूर स्टेशन येथे दहीहंडी निमित्त स्टेज बांधल्याने बस मार्ग क्रमांक ८ म ए १९ ३५५ म ए ३६२ . ए ३६४ ए ३७५ हे १ वाजल्यापासून शरद आचार्य मार्ग एम वॉर्ड ऑफिस मार्गे परावर्तित करण्यात आले होते.

वरळी गाव कोस्टल रोड येथे दहीहंडी उभारल्याने बसमार्ग क्रमांक १६९ ही ५४ या बाबासाहेब वरळी चौक येथून दुपारी २.४५ वाजल्यापासून दोन्ही दिशेने वरळी आगार अशा परावर्तित केल्या.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत