डायनामिक प्रीमियम तत्काळ तिकिटाने प्रवाशाला शॉक 
मुंबई

डायनामिक प्रीमियम तत्काळ तिकिटाने प्रवाशाला शॉक; २९०० रुपयांचे तिकीट १०,१०० रुपयांना

रेल्वेच्या डायनामिक प्रीमियम तत्काळ यंत्रणेवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

कमल मिश्रा

मुंबई : रेल्वेच्या डायनामिक प्रीमियम तत्काळ तिकिटाच्या दराने प्रवाशाला शॉक बसण्याची वेळ आली आहे. बंगळुरू ते कोलकाता रेल्वे प्रवासासाठी प्रवाशाला १०,१०० रुपये मोजावे लागले. यामुळे रेल्वेच्या डायनामिक प्रीमियम तत्काळ यंत्रणेवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

एसएमव्हीएम हावडा एक्स्प्रेसचे बंगळुरू ते कोलकाता प्रीमियम तत्काळ तिकीट ९ ऑगस्ट रोजी काढले. बंगळुरू ते कोलकाता दुसऱ्या वर्गाचे एसीचे रेल्वे भाडे २९०० रुपये आहे. पण, डायनामिक प्रीमियम तत्काळ भाडे १०,१०० रुपयांवर पोहोचले. यामुळे प्रवाशाला शॉक बसला. त्याने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला.

बंगळुरू ते कोलकाता हे द्वितीय एसीचे भाडे २९०० रुपये असताना माझ्याकडून १०,१०० रुपये का घेतले गेले हे मला समजत नाही, असा संताप प्रवाशाने व्यक्त केला.

रेल्वेचे डायनामिक प्रीमियम तत्काळ भाडे पद्धत ही प्रवाशांवर अन्याय करणारी आहे. एका यूजरने सांगितले की, तत्काळ चार्जेस व डायनामिक चार्जेस देणे अयोग्य आहे, तर दुसरा यूजर म्हणाला की, तुम्ही रेल्वेला प्रीमियम तिकिटाचा दर देण्याऐवजी विनातिकीट प्रवास करा आणि दंड भरा.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात