Mumbai : सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींचा ऐवज लंपास; एका आरोपीला अटक (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींचा ऐवज लंपास; एका आरोपीला अटक

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत सुमारे २.६५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत सुमारे २.६५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला पहिले मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. त्याला फोर्ट येथील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

नोकरांनीच केला घात

घरातील विश्वासू नोकरांनीच टप्प्याटप्प्याने चोरी केल्याचा संशय आहे. चोरीच्या वस्तूंमध्ये सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रकमेचा समावेश आहे. २०२५ मधील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज खराब झाल्याने चोरट्यांनी फायदा घेतला. घरातील चार नोकरांनी पद्धतशीरपणे चोरी केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

एकाला अटक

पोलिसांनी प्रकरणात प्रवाणी रमेश सोलंकी याला अटक केली आहे. तो गेल्या २४ वर्षांपासून अहिर यांच्या घरात काम करत आहे. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी याने चोरीचा माल विकल्याची आणि त्यातून मिळालेले पैसे साथीदारांमध्ये वाटल्याची कबुली दिली आहे. प्रवीण सोलंकी हा गेल्या २४ वर्षांपासून साफसफाईचे काम करत होता. जुना नोकर असल्याने त्याला वरळीतील कार्यालयाच्या स्वच्छेतेचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

१६ जुलै २०२६ रोजी हे प्रकरण पहिल्यांदा उघड झाले. कुटुंबातील एका व्यक्तीला सांगण्यात आले की घरातील इतर कामगारांपैकी सतीशकुमार मिस्त्री आणि अमितकुमार प्रसाद यांना कमी पगार असतानाही झारखंडमधील त्यांच्या गावात नवीन घर, नवीन वाहने आणि इतर मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर नोकरांची चौकशी करण्यात आल्यानंतर चोरीचे प्रकरण उघड झाले.

काय चोरले?

१५ लाख रुपयांचे १०० ग्रॅम सोन्याचे बिस्किट, ४५ लाखांच्या हिरे जडीत सोन्याच्या दोन बांगड्या आणि अंदाजे ५० लाखांची हिरेजडीत अजून एक बांगडी त्यांनी चोरली. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी शॉर्ट सर्किटमुळे घरात आग लागली होती. या घटनेवेळी काही रक्कम चोरीला गेली होती. सीसीटीव्हीतही काही गडबड करण्यात आली होती. तर आरोपींच्या वतीने वकिलांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचा युक्तिवाद केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती