मुंबई

सचिन वाझे अनिल देशमुख प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार

प्रतिनिधी

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवल्याने त्यांना भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली असून यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.

सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसेच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

कोर्टाने सचिन वाझेंची याचिका स्वीकारल्यास त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. तसेच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरे जावे लागणार नाही. सचिन वाझेंनी सक्तवसुली संचालनायकडेही (ईडी) अशीच विनंती केली होती. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात सचिन वाझेंनी ईडीचे सहाय्यक संचालक आणि तपास अधिकाऱ्याला पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांना आपण माफीसाठी आपल्याकडे असणारी सर्व माहिती उघड करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र, यासंबंधी सचिन वाझे किंवा ईडीने विशेष कोर्टात कोणतेही पाऊल उचललेले नाही.

सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात ४ एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. याच प्रकरणात सचिन वाझेंनी बुधवारी कलम ३०६ अंतर्गत आपले वकील रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल