Mumbai : उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

साकीनाका घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून चार अधिकाऱ्यांना निलंबित करम्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : साकीनाका घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून चार अधिकाऱ्यांना निलंबित करम्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले असून चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त श्री. धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) श्री. दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) श्री. अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) श्री. उत्तम पाटील यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे, असे त्यांनी जाहीर केले.

सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जी करणाऱया संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी गठीत करण्यात आली आहे. सात दिवसात आपला अहवाल सादर करण्यास या समितीला सांगण्यात आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड