Mumbai : साकीनाका मॅनहोल चौकशी अहवाल गुलदस्त्यातच संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : साकीनाका मॅनहोल चौकशी अहवाल गुलदस्त्यातच

साकीनाका खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना २ जुलै २०२६ रोजी घडली. या घटनेची चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : साकीनाका खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना २ जुलै २०२६ रोजी घडली. या घटनेची चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केला. मात्र, शेख यांच्या म्हणण्यानुसार, या अर्जाला थेट माहिती देण्याऐवजी तो अवघ्या २८ दिवसांत पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये तब्बल पाच वेळा हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे चौकशी अहवाल नेमका कुठे आहे आणि तो उपलब्ध करून देण्यास प्रशासनाला अडचण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

शेख यांनी मागितलेल्या माहितीत २ जुलैच्या घटनेचा संपूर्ण चौकशी अहवाल, चौकशी आदेश, जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे, निलंबन आदेश, कंत्राटदारावरील कारवाई, विभागीय अथवा फौजदारी कारवाई, मृताच्या कुटुंबाला देण्यात आलेली नुकसानभरपाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा समावेश आहे. शेख यांच्या माहितीनुसार १ सप्टेंबरला अर्ज माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी, अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात दिला. त्यानंतर २ सप्टेंबरला तो माहिती अधिकारी, उप आयुक्त यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला. ८ दिवसानंतर पुढे १० सप्टेंबरला अर्ज प्रमुख चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठविण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातम्यया वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

सोयाबीनच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची घट; शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग आर्थिक संकटात

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी