संजय राऊत 
मुंबई

संजय राऊत यांच्या सुटकेला आव्हान; सुनावणी १८ जूनला

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना निर्दोष सुटका करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची हायकोर्टाने दखल घेतली. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने राऊत यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी १८ जूनला निश्चित केली.

Swapnil S

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना निर्दोष सुटका करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची हायकोर्टाने दखल घेतली. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने राऊत यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी १८ जूनला निश्चित केली.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी, हे वृत्त वाचून आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते.

राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने केल्याचा दावाही मेधा यांनी केला होता.

Delhi CNG Blast : सीएनजी भरतानाच ट्रकच्या टँकचा भीषण स्फोट; ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, परिसर हादरला

खोपोली-सीएसएमटी लोकल दादरपर्यंतच; प्रवाशांचे हाल, पूर्ववत सेवा सुरू करण्याची मागणी

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; मीरा-भाईंदर ते विरार मेट्रोला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मान्यता