मुंबई

मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सेन्सेक्स ५२४ अंकांनी वधारला

प्रतिनिधी

हिंदू संवत २०७९ च्या प्रारंभी मुंबई शेअर बाजारात झालेल्या मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सेन्सेक्स ५२४.५१ अंकांनी वधारून ५९,८३१.६६ वर बंद झाला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात झाल्याने वर्ष चांगले जाईल, अशी आशा गुंतवणूकदार बाळगून आहेत.

दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या दिवशी मुहूर्ताचे सौदे केले जातात. सायंकाळी ६.१५ ते ७.१५ पर्यंत बाजारात व्यवहार झाले. मुहूर्ताच्या सौद्यांना सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स ७०० अंकांनी वधारून ५९९९४.२५ वर पोहोचला. तासाभराच्या व्यवहारात सेन्सेक्स ५२४.५१ अंकांनी वधारून ५९.८३१.६६ वर बंद झाला, तर निफ्टी १५४.४५ अंकांनी वधारून १७७३०.७५ वर बंद झाला. नेस्ले, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डी आदींचे समभाग विभाधारले तर हिंदुस्थान युनिलिव्हर व कोटक महिंद्रा बँकेचे समभाग घसरले नवीन संवत २०७९ ची सुरू होत असताना बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. गेल्या शुक्रवारी वॉल स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक वातावरण होते. तसेच त्या दिवशी टोकियो सेऊलचे समभाग बाजारही वधरले होते. गेल्या वर्षी संवत २०७८ ला सेन्सेक्स ४६४.७७ अंकांनी, तर निफ्टी २५२.९० अंकांनी घसरला होता. यंदा युक्रेन रशिया युद्ध वाढीत महागाई विकसित देशांनी वाढवलेले व्याजदर तरीही भारतीय शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली असे जिओजित फायनान्शियल सर्विस चे मुख्य गुंतवणूक धोरण करते वीके विजयकुमार यांनी सांगितले हे त्या बुधवारी शेअर बाजाराला बलिप्रतिपदे निमित्त निमित्त सुट्टी आहे

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर