मुंबई

गैरवापर करणाऱ्यांना करा ‘खामोश’; शत्रुघ्न सिन्हा यांची उच्च न्यायालयात धाव

बॉलीवूडमध्ये ‘खामोश’ या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या विशिष्ट उंचीवर पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : बॉलीवूडमध्ये ‘खामोश’ या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या विशिष्ट उंचीवर पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘खामोश’ डायलॉगसंदर्भातच वैयक्तिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेची सोमवारी न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दखल घेतली आणि याचिकेवर सविस्तर सुनावणी घेण्यास तयारी दाखवली.

'खामोश' डायलॉगचा सोशल मीडियामध्ये सर्रास वापर केला जात आहे. माझ्याकडून कोणतीही संमती न घेता माझ्या नावाचा, प्रतिमेचा आणि प्रसिद्ध पंचलाइनचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी याचिकेत केला आहे. याचवेळी त्यांनी आरोप लावलेल्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरुद्ध अंतरीम आदेश देण्याची विनंती केली आहे. सिन्हा यांच्या वकिलांनी या संदर्भात युक्तिवाद केला. त्याची नोंद घेता न्यायमूर्ती देशमुख यांनी अंतरिम विनंतीसंदर्भात निर्णय राखून ठेवला.

मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

सोशल मीडियामध्ये माझ्या प्रसिद्ध डायलॉगचा तसेच नाव आणि प्रतिमेचा होत असलेला वापर हा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा दावा सिन्हा यांनी केला आहे. त्यांनी १९७६ च्या 'छोटी सी बात' चित्रपटातील त्यांचे नाव, आवाज, विशिष्ट पद्धती, ट्रेडमार्क संवाद 'खामोश' आणि व्यक्तिरेखा व्यावसायिक फायद्यासाठी पूर्व परवानगीशिवाय वापरणाऱ्या संस्थेविरुद्ध कायमस्वरूपी मनाई आदेश देण्याचीदेखील मागणी केली आहे. गेल्या काही दशकांपासून चित्रपटसृष्टीत चांगली ओळख कमावली आहे. अशा स्थितीत सोशल मीडियामध्ये होत असलेला गैरवापर आपल्या प्रतिमेचे गंभीर नुकसान करीत आहे, असे सिन्हा यांनी याचिकेत म्हटले आहे.

ओबामांनी 'मोठी चूक' केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप; UFO आणि एलियन्सशी संबंधित फाइल्स जाहीर करण्याचे दिले आदेश

जिमखान्याच्या मनमानीला बसणार चाप; धोरण बदलासाठी अभ्यासगटाची नेमणूक

Mumbai : आईने वाढवलेल्या मुलाला वडिलांचे नाव, जातीची सक्ती नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : अनंत गर्जे याच्या जामिनावर निर्णय राखीव

Aviation Safety Lapse: विमान तपासांच्या ९ नोंदी अधिकृत रेकॉर्डमधून ‘गहाळ’; तीन वर्षांत केवळ २३ टक्के प्रकरणांचे तपास पूर्ण